1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (13:28 IST)

देवेंद्र फडणवीस : भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल

Devendra Fadnavis: The government will be formed under the leadership of BJP
भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत निवडक पत्रकरांशी बोलताना त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
 
"त्यांना (शिवसेनेला) ५ वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे. १९९५ चा फॉर्म्युला होईल की नाही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणती खाती द्यायची हे चर्चेला बसल्यावर कळेल," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
 
उध्दव ठाकरेंचं आणि माझं निकालानंतर फोनवर बोलणं झालं आहे. आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
 
"सामनामध्ये ज्या पध्दतीने लिहिलं जातं त्यावर आम्ही खूश नाही. आमची नाराजी आहेच. कॉंग्रेस राष्ट्रवादी जे म्हणत नाही ते सामनामध्ये शिवसेना म्हणते. वृत्तपत्र म्हणून ते भूमिका घेतात, पण लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. इतक्या ताकदीने कॉंग्रेस - राष्ट्रवादीवर पण लिहून दाखवा," असं आव्हान फडणवीसांना शिवसनेला दिलं आहे.
 
दरम्यान उद्या होणाऱ्या भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीसाठीच्या बैठकीला अमित शहा येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.