मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (10:51 IST)

जेफ बेझोस यांनी उपकार केले नाहीत - पीयूष गोयल

Jeff Bezos did not do the favors - Piyush Goyal
जेफ बेझोस यांनी भारतात एक अब्ज डॉलर (7,100 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा करून उपकार केले नाहीत, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.  
 
"गेल्या वर्षी अॅमेझॉनने म्हटलं होतं की त्यांना 7-8 हजार कोटींचं नुकसान झालं. ते हे नुकसान कसं काय सोसू शकतात?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ई-कॉमर्स कंपन्यांनी भारतातील या क्षेत्रातील कायद्यांच्या कमतरतेचा गैरवापर करू नये असं गोयल यांनी स्पष्ट केलं, जेफ बेझोस हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.
 
दरम्यान, देशाला आर्थिक प्रगतिपथावर नेण्याची दूरदृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे आहे, असं टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी म्हटलं. गांधीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या इंडियन स्कूल ऑफ स्किल्सच्या शिलान्यास समारंभावेळी ते बोलत होते. ही बातमी दैनिक भास्करने दिली आहे.