1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (13:24 IST)

CAA विरोधातील आंदोलनाचे देशभरात पडसाद, रामचंद्र गुहा आणि योगेंद्र यादव ताब्यात

CAA म्हणजेच नागरिकता दुरुस्ती विधेयकाविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन पेटलं आहे. सुरुवातीला आसाम आणि दिल्ली या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचं लोण देशभर पसरलं आहे.
 
CAA चा विरोध करण्यासाठी लाल किल्ल्यासमोर लोक जमत आहेत. पोलिसांनी स्वराज्य पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांना ताब्यात घेतलं आहे.
 
तर, बंगळुरूमध्ये निदर्शनासाठी बाहेर निघालेल्या रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असूनही डाव्या पक्षांनी तिथे निषेध आंदोलन केलं.
 
हैदराबाद, चेन्नई आणि चंदीगढमध्येही निषेध मोर्चे निघाल्याचं वृत्त आहे.
 
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांनी आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलेलं आहे.
 
या कायद्याच्या विरोधात देशभरामध्ये निदर्शनं केली जाणार असल्याचं सीपीएम, सीपीआय, सीपीआय(एमएल), फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपीने ने संयुक्त पत्रकाद्वारे सांगितलंय.
 
अनेक विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा घोषित केलेला आहे.