1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (14:55 IST)

रामदास आठवले यांचा गो कोरोनानंतर नो कोरोनाचा नारा

Ramdas Athavale
'नो..कोरोना... कोरोना नो' केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी नवा नारा दिला आहे. यूकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळून आला. त्याविरोधात रामदास आठवले यांनी 'नो..कोरोना...नो..' चा नवा नारा दिला आहे.
 
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीयमंत्री आठवले यांनी 'गो कोरोना गो' असा नारा दिला होता.
 
रामदास आठवलेंचा हा नारा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
आठवलेंच्या 'गो कोरोना गो' ची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. त्यावेळी बीबीसीशी बोलताना रामदास आठवले यांनी गो कोरोना गो' हा टिंगलटवाळीचा विषय नसल्याचं वक्तव्य केलं होतं.
 
रामदास आठवले यांना देखील कोरोना झाला होता. त्यातून ते बरे झाले. डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळा आणि आपली काळजी घ्या असं आवाहन त्यांनी त्यावेळी केलं होतं.
रविवारी कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनबद्दल आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले, 'मी आधी गो कोरोना गो...असा नारा दिला होता. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना पहायला मिळत आहे.
 
आता कोरोनाच्या नवीन स्ट्रेनसाठी मी 'नो..कोरोना...नो..' असा नारा दिला आहे,' पुण्यात दौऱ्यावर असताना एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले यांनी हे वक्तव्य केलं.
 
फेब्रुवारी महिन्यात मुंबईत चीनी राजदूत आणि काही बौद्ध धर्मगुरूंसोबतच्या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी 'गो कोरोना गो' असा नारा दिला होता.
 
यूकेमध्ये आढळून आलेलं कोरोना व्हायरसचं नवीन रूप अधिक घातक असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात आत्तापर्यंत यूकेहून आलेले 16 प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याचं आढळून आलं आहे. यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इंनस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत.