सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (15:41 IST)

इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोना

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंडमधून प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, त्याची कोरोनाच्या विषाणूची स्ट्रेन इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या विषाणूंशी मिळती-जुळती आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.
 
१३ डिसेंबर रोजी तो व्यक्ती पुण्यात परतला होता. १७ तारखेला त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्या तरुणाला कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’ची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) ‘जेनेटिक सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात येणार असल्याचेही वावरे म्हणाले.
 
२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान युरोप आणि मध्यपूर्व आशियातून राज्यात ५४४ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३०० प्रवासी पुण्यातील असून, त्यांचा शोध लागला आहे. या सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वावरे यांनी दिली.