1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (13:47 IST)

SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात

SBI pledges Rs 76
स्टेट बँक ऑफ इंडिया ने दिवाळखोरीत गेलेल्या 220 जणांचं कर्ज बुडित खात्यात टाकलं आहे. हे एकूण कर्ज 76 हजार 600 कोटींचं आहे. तांत्रिकदृष्ट्या हे कर्ज 'राइट ऑफ' म्हणजे निर्लेखित करण्यात आलं आहे. CNN News 18 ने रिझर्व्ह बँकेत दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून ही माहिती मिळाली. 
 
यामध्ये बँकांची 31 मार्च 2019 पर्यंतची 100 कोटींपासून ते 500 कोटीपर्यंतचं कर्ज बुडित खात्यात टाकली आहेत. या दिवाळखोरीत निघालेल्या कर्जदारांमध्ये SBI आणि पंजाब नॅशनल बँकेचे कर्जदार मोठ्या संख्येने आहेत.
 
याच पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार पुढे आलेले आहेत. IDBI या बँकेनेही कर्जदारांची कर्जं बुडित खात्यात घातली आहेत. त्याचबरोबर या यादीत कॅनरा बँकेचे कर्जदारही आहेत.