गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (13:24 IST)

नागरिकत्व सुधारणा कायदा अत्यंत वाईट- सत्या नडेला

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा अत्यंत वाईट असल्याचं म्हटलं आहे. बझफिड या वेब पोर्टल चे मुख्य संपादक बेन स्मिथ यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे.
 
ते म्हणतात बझफिड च्या एका कार्यक्रमात बोलताना सत्या नडेला म्हणाले, "मला असं वाटतं की जे होतंय ते फार वाईट आहे. माझी फार इच्छा आहे की एखाद्या बांगलादेशी नागरिकाने येऊन युनिकॉर्न तयार करावी किंवा तो इन्फोसिससारख्या कंपनीचा सीईओ व्हावा," द हिंदूने ही बातमी दिली आहे.
 
नडेला मूळचे हैदराबादचे असून सध्या ते मायक्रोसॉफ्ट या आघाडीच्या कंपनीचे सीईओ आहेत. या ट्वीटनंतर सत्या नडेला यांच्यातर्फे एक निवेदन जारी करण्यात आलं.
 
त्यात नडेला म्हणतात, "भारतीय संस्कृतीत लहानाचं मोठं होणं आणि मग अमेरिकेत स्थायिक होणं हे माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत. मला असं वाटतं की एखाद्या निर्वासिताने भारतात एखादी मोठी कंपनी स्थापन करावी आणि त्याचा फायदा भारतीय जनतेला व्हावा."