स्वस्त आणि चांगली सहल हवी आहे, तर प्रवास करताना आपण या टिप्स अवलंबवून आपले पैसे वाचवू शकता
आपण प्रवासाला जाण्याची योजना आखता तेव्हा आपण प्रवासासाठी योग्य ठिकाणाची निवड करता आणि तिथे जाऊन नवे अनुभव घेता. त्यासाठी आपण प्रवास योजना अशी केली पाहिजे जी आपल्यासाठी आणि आपल्या सह जाणाऱ्या लोकांसाठी संस्मरणीय ठरेल.
नक्कीच असा प्रवास संस्मरणीय असतो. परंतु बऱ्याच वेळा असे आढळून येते की आपण प्रवास करताना आपण किती खर्च केला हे विसरतो, कारण शेवटी, जेव्हा आपण खर्चाची मांडणी करतो, तेव्हा आपण मनातल्या मनात, विचार करतो की खूप खर्च झाला आहे, अजून पूर्ण महिना आहे, हे कसे चालेल इ. अशा स्थितीत अनेक वेळा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आपण काही विशेष गोष्टींना लक्षात घेऊन आपल्या सहलीला आणि प्रवासाला अधिकच आनंददायी बनवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
1 ऑफसीजन जाऊ शकता-साधारणपणे असे आढळून येते की लोक फिरायला जाण्यासाठी हिल स्टेशनची निवड करतात.अशा परिस्थितीत, आपण ऑफ सीझन मध्ये जाऊ शकता, कारण असे केल्याने आपल्याला सर्व काही (तिकिटे, हॉटेलचे शुल्क, खाद्यपदार्थांच्या किमती, भेट देण्याच्या ठिकाणांची तिकिटे वगैरे) खूप कमी पैशात मिळतील आणि आपला प्रवासही स्वस्त होईल .
2 हॉटेल बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा -
लोक फिरायला गेल्यावर तिथे हॉटेल शोधतात, ज्यामुळे त्यांना हॉटेल खूप महाग मिळतात.अशा परिस्थितीतआपण आगाऊ हॉटेल्स ऑनलाईन बुक कराव्यात, अनेक वेबसाईट तपासल्यानंतरच हॉटेल्स बुक कराव्यात, हॉटेलचे रिव्ह्यू नक्की वाचावेत आणि जर आपला ग्रुप मोठा असेल तर तुम्ही हॉटेलवाल्यांशी कॉलवर बोलू शकता आणि त्यांच्याकडून विशेष ऑफर घेऊ शकता.असे केल्याने आपले खर्चही कमी होतील.
3 घरातील खाद्य पदार्थ बरोबर न्यावे-बरेच लोक असतात जे वाटेत एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेल मध्ये जेवायला थांबतात. असे करण्याचे दोन तोटे आहेत, प्रथम आपल्याला भरमसाठ बिल भरावे लागतात कारण हॉटेलचे जेवणाची किंमत खूप महाग असते. आणि दुसरे म्हणजे बाहेरचे अस्वच्छ अन्न आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. म्हणून, आपण घरातून तयार केलेले अन्न घेऊन जावे.किंवा काही फरसाण चिवडा सारखे खाद्य पदार्थ घेऊन जावे.
4 कसे जायचे? -जिथे आपण सहलीची योजना आखत आहात, तिथे आपण कोणत्या कार, बस, टॅक्सी, ट्रेन, फ्लाइट इत्यादी साधनाने जावे जेणेकरून आपल्याला कमी भाडे द्यावे लागेल. या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. भेट देण्याच्या ठिकाणी आपण स्कूटर, बाईक इत्यादी भाड्याने घेऊ शकता.