निसर्गांनं नटलेलं केरळ

Kerala
Kerala
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (10:41 IST)
केरळला निसर्गाचे वरदान आहे. सुवासिक मसल्यांसाठी प्रसिद्ध असणारे आपल्या सौदर्याचीही भुरळ घालते. मनमोहक बिच, हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य मनाला अल्हाददायक वाटते. पांढरी वाळू आणि नजर जाईल तिथपर्यंत फेसेळलेला समुद्र या सौंदर्यात अधिकच भर घालतो. नैसर्गिक सौंदर्य आणि ‍सुवासिक मसाल्यांबरोबरच औषधी वनस्पतींसाठी केरळ लोकप्रिय आहे. केरळ हे भारतातील असे एकमेव राज्य आहे की, ज्याठिकाणी आयुर्वेदाचे मुख्यघ केंद्र विकसीत झाले आहे. देश-विदेशातील लोक येथे आयुर्वेदिक उपचारासाठी येतात.

केरळचे समुद्रकिनारे-
केरळमध्ये चुआरा बीच, बेकल बीच, कोवलम बीच, मरूदेश्वर बीच, वर्कला बीच, शांघमुघम आदीं बीच आहेत.

कोवलम बीच-
हा केरळमधील आकर्षक समुद्रकिना-यांपैकी एक आहे. मालाबार या छोट्याशा गावात हा बीच आहे. अर्धचंद्राकर आकारामुळे हा बीच अधिकच आकर्षित वाटतो. याची दक्षिण बाजू 'लाइट हाउस' या नावाने प्रसिद्ध आहे. कोवलम बीचवर आपल्याला आपल्या बजेटमध्ये रहाण्याची सोय होऊ शकते. समुद्रकिना-यावरील नारळआणि ताडाची झाडे सायंकाळ आठवणीतील बनवतात. हा बीच योग आणि स्वास्थ्य केंद्र म्हणूनही परीचित आहे. आयुर्वेदिक तेल मालिश व एरोमा बॉथची सोय याठिकाणी आहे.

वर्कला पापानासम बीच -
याठिकाणी पर्यटकांची संख्या कमी असते. येथे सूर्यास्तावेळचे दृश्य मनमोहक दिसते. येथून केवळ 42 किमीवर तिरुअनंतपुरम आहे. येथील जर्नादन व अय्यपा मंदिरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

केरळ नॅशनलपार्क -
निसर्गसौदर्यांने नटलेले आणि केरळमधील वन्यप्राणी पाहण्यासाठी नॅशनलपार्क पाहण्याजोगा आहे. हिरव्यागार जंगलामध्ये आपल्याला अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. काही दुर्मिळ प्राणीही याठिकाणी आहेत. केरळमध्ये इर्रावीकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, साईलेन्ट वॅली नॅशनल पार्क असेही पार्क आहेत.

इर्रावीकुलम नॅशनल पार्क -
'नीलगाय तराह' च्या संरक्षणासाठी या नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली आहे. हा केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर आहे. हिमालयाच्या थंड वातावरणात रहाणारा नीलगाय हा दुर्मिळ प्राणी आहे. फुलापानांनी बहरलेल्या या पार्कला 1978 मध्ये नॅशनल पार्कचा दर्जा मिळाला आहे.

पेरियार नॅशनल पार्क -
हा पाकँ पश्चिमेला आहे. वाघाच्या संरक्षणासाठी याची निर्मिती करण्यात आली. आता हा पार्क जगभरात प्रसिध्द आहे. 1895 मध्ये इंग्रजांनी या पार्कची सुरूवात केली. त्यावेळी यांठिकाणी कृत्रिम तलाव आणि बांध बांधण्यात आला होता.
साईलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क -
कुंडलई टेकडीवर हा पार्क आहे. औषधी आणि झाडांच्या दुर्मिळ जाती याठिकाणी मिळतात. वाघ, सिंह, माकड असे प्राणी याठिकाणी आहेत. हा पार्क लहान आहे पण, नदी, डोंकर असे प्राण्यांसाठी अनुकूल वातावरण आहे.

वयनाड वाइल्ड लाईफ सेन्च्युरी -
ही सेन्च्युरी वाघ आणि बिबट्यांसाठी प्रसिध्द आहे. बॉदीपुर नॅशनल पार्कचाच हा एक भाग आहे.
केरळमध्ये पाहण्याजोगे -
मुन्नार, इड्डुकी, लक्कडी, मंगलम बांध, पेरीमेड, देवीकुलम आदीं हिल्सस्टेशन. बोलघट्टी पॅलेस, कोईक्कल पॅलेस, कृष्णापुरम महाल, कुथिरामलिका, द चित्रा आर्ट गॅलेरी, सेंट फ्रांन्सिस चर्च, टाउन हॉल आदीं केरळमधील प्रमुख स्मारक आहेत.

केरळमध्ये कधी जाल -
सप्टेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत याठिकाणचे हवामान उत्तम असते. यावेळी केरळमध्ये हजारो पर्यटक असतात. मात्र, पावसाळ्यात गर्दी कमी असते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा
कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर ...

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान
एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान आमच्याकडे फक्त तुमचा मुलगा आणि मुलगी पाठवा ।। आम्ही ...

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम केले, फोटो झाले  व्हायरल
सुहाना खान: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप फिल्मी जगात पाऊल ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा प्रीमिअर २७ फेब्रुवारीला
इरॉस नाऊ ने आज आपल्या ओरिजिनल चित्रपट ‘पेन्शन’ची घोषणा केली असून यात सोनाली कुलकर्णी आणि ...