testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

येथे रामाला ‍देतात बंदुकांची सलामी

ram temple, tikamgarh
देशाचे हृदय म्हटल्या जाणार्‍या मध्ये प्रदेशातील जिल्ह्यातील ओरछा हे ठिकाण ऐतिहासिक तसेच धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्धीस आले आहे. येथे असलेल्या राजा मंदिरामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. येथे भगवान राम देव म्हणून नाही तर राजा म्हणून विराजमान आहेत व त्यांच्यासाठी सूर्योदय व सूर्योस्ताला पोलिस बंदुकींच्या फैरी झाडून सलामी देतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा पाळली जाते. तसेच येथे येणार्‍या भाविकांना प्रसाद म्हण़न नाही तर राजशिष्टाचार म्हणून विडा देण्याची प्रथाही आहे.
या मंदिराची हकीकत अशी सांगतात की महाराणी गणेशकुंबवर ही मोठी होती. तिने अयोध्येत जाऊन शरयू तीरावर मोठी साधना केली, इच्छा एकच होती, रामलल्लाचे दर्शन व्हावे. पण ते काही होईना तेव्हा निराश झालेल्या महाराणीने शरयूत उडी घेतली. नदीत आत बुडल्यावर तिला रामाचे दर्शन झाले. रामाने तिची इच्छा विचारली तेव्हा बालरूपात तुम्ही माझ्याबरोबर ओरछा येथे यावे असे तिने सांगितले.
राम बालकरूपात तिच्यासोबत महालात आले व तिने त्या बालकाला खाली ठेवले तेव्हा त्याची मूर्ती बनली. तेव्हापासून हा राजवाडा मंदिर बनला. यावेळी येथे राजा मधुकरशाहचे राज्य होते. अर्थात येथील राजा म्हणून रामाला मान मिळाला. परिणामी त्याचे मंदिर एखाद्या किल्ल्यप्रमाणेच आहे. भाविकांचा असाही विश्वास आहे की या राममूर्तींचा डावा पायाचा अंगठा ज्याला दिसेल त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात.


यावर अधिक वाचा :

मराठीचा नादखुळा

national news
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात... मास्तर - कावळा सरळ का उडतो? संतोष - कारण तो ...

ठग्स ऑफ हिंदोस्तान येत्या ८ नोव्हेंबरला भेटीला येणार

national news
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ...

37 वर्ष लहान जसलीनबरोबर रोमांस करणारे अनूप जलोटा तीनदा ...

national news
बिग बॉस सीझन 12 ची धमाकेदार सुरुवात झाली जेव्हा प्रसिद्ध भजन गायक अनूप जलोटा यांनी ...

राहत काझमी यांच्या 'मिलियन डॉलर नोमॅड' चित्रपटाचे वितरण

national news
अत्यंत स्तुत्य आणि विख्यात चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राहत काझमी नेहमीच आपल्या ...

अनूप जलौटा गर्लफ्रेंड सोबत बिगच्या घरात

national news
रिॲलिटी शो असलेल्या बिग बॉसचं १२ वे सीझन शोमध्‍ये भजन गायक अनूप जलौटा आहेत. हा शो ...