शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2015 (16:46 IST)

मॉरिशस : संस्कृतीची सरमिसळ

मॉरिशसमध्ये संस्कृतीची सरमिसळ आहे. विविध जातीचे लोक तेथे मिळून मिसळून बंधुभावाने राहतात. मॉरिशसच चारही बाजूने समुद्र आहे. इथल्या सागरतळाशी नव्या दुनियेचा शोध घेत संशोधक तासन्तास रमतात. इथल्या समुद्रकिनार्‍यावर मोठमोठी जहाजे प्रवाशांना आत घेऊन जाण्यासाठी उभी असतात. 
 
या जहाजांवर तीन स्कूटर्स असतात. प्रत्येकावर दोन प्रवासी बसू शकतात. ही जहाजे समुद्रात खोलवर जातात. तिथे समुद्राची खोली 10 ते 15 फूट असते. प्रवासी स्विमिंग सूट घालून या स्कूटरवर बसतात. जहाजावर रक्षक असतात. ते या स्कूटर्सला समुद्राच्या पृष्ठभागावर सोडतात. याशिवाय खाली आधीच तीन ते चार रक्षक असतात. 
 
पाण्यामध्ये स्कूटरवर बसून प्रवासी फिरत असतात. त्यांच्याबरोबर सुरक्षारक्षक, डायमास्टर असतात. समुद्राच्या आतील गुहा, बोगदे दाखवून त्यांना फिरवले जाते. अनेक चित्रविचित्र प्राणी, विविध प्रकारचे मासे उदा. बॉक्स, लाइमस्पॉट, बटरफ्लाय, जॉईंट मूरेन, बलून, पोरक्युपाइनिश यालाच दाइदीन असंही म्हणतात. हे सर्व उघडय़ा डोळ्यांनी पाहताना प्रवासी थक्क होतात. 
 
कलर्स ऑफ अर्थ इथे येण्याआधी ब्लॅक रिव्हर गोरजेज इथे पोहाचता येते. याच्याजवळ निसर्गाचा चमत्कार दाखविणारे पवित्र सरोवर आहे. चामरेल मध्ये सात रंगांची माती दिसते. जणू काही अरबस्तानातील सात वेगवेगळ्या शहरामधून ही सप्तरंगी वाळू आणली आहे.
 
कसीला वर्ड पार्क या अभारणमध्ये जवळपास 1500 जातीचे पक्षी दृष्टीला पडतात. इथे अनेक फॉर्म, पर्णकुटय़ा आहेत. तेथे सिंह, चित्ता, वानर, सुसरी असे अनेक प्राणी आढळतात. लहान मुलं व वृद्ध सिंह किंवा चित्तला स्पर्श करू शकतात. ते अंगावर येत नाहीत म्हणूनच पर्यटकांना इथे येऊन निसर्गाचा सहवास खर्‍या अर्थाने अनुभवता येतो. 
 
पोहता न येणारा प्रवासीसुद्धा हा संस्मरणीय अनुभव घेऊ शकतो. तो म्हणजे समुद्राखाली चालणं. सागराच्या पोटात चालणं हा वेगळाच अनुभव असतो. कॅटामरान क्रुझमधून प्रवाशाना दिवसभर फिरवलं जातं. एलिक्स सर्फ हे मॉरिशसच्या पूर्वेला जलक्रीडेचे सुंदर क्रीडास्थान आहे. जलक्रीडेची सर्व साधने इथे उपलब्ध आहेत. मॉरिशस बेटांवर रामाचे व इतर देवतांची मंदिरेही आहेत. येथे निवासी भारतीयांची संख्या मोठी आहे. हे भारतीय व्यापार, उद्योगासाठी फार पूर्वी तेथे जाऊन स्थायिक झाले आहेत.
 
  म. अ. खाडिलकर