रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (09:16 IST)

स्वामी विवेकानंद जयंती 2024 : स्वामी विवेकानंद महान व्यक्तिमत्त्व बायोग्राफी मराठी

swami vivekanand
स्वामी विवेकानंद हे उच्च विचाराचे महान व्यक्ती होते.त्यांच्या विचारांचा   आध्यात्मिक,ज्ञान, आणि सांस्कृतिक अनुभवाचा प्रत्येक व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो. ते तरुणांसाठी मार्गदर्शक आणि भारताचा अभिमान आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र असे.त्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी दत्त होते.त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.या मुळे त्यांच्या वर चांगले संस्कार होते.त्यांचे वडील उच्च न्यायालयात वकिली करत होते.
 
स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत होते.ते अलौकिक प्रतिभावंत होते.ते लहान असताना त्यांना इतिहास साहित्य अशा अनेक विषयांची आवड होती. त्यांनी तत्त्वज्ञान,धर्म, इतिहास,सामाजिक विज्ञान,कला व साहित्य इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान मिळवले.त्याच बरोबर त्यांनी वेद ,उपनिषद ,पुराण ,रामायण-महाभारत अशा हिंदु धर्मात ग्रंथांचा अभ्यास केला.त्यांना वाचन ,व्यायाम ,कुस्ती ,पोहणे,घोडेस्वारी, गायन-वादन इत्यादींची आवड होती. .स्वामी विवेकानंदांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान होते.  त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त पाश्चात्त्य संस्कृतीत विश्वास ठेवायचे आणि ते आपल्या मुलाला म्हणजे नरेंद्रला देखील इंग्रजी शिकवून पाश्चात्त्य संस्कृतीची शिकवण देऊ इच्छित होते. नरेंद्र ह्यांची बुद्धी लहान पणापासून तल्लख होती.  त्यांच्यामध्ये आई वडिलांचे चांगले गुण आले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक नवा आकार मिळाला आणि ते उत्तम गुणवत्तेचे धनी झाले. त्यांच्या मध्ये देवप्राप्ती करण्यासाठी  प्रबळ तळमळ होती. या साठी ते ब्रह्म समाजात गेले तरी ही त्यांना काही समाधान मिळाले नाही. त्यांनी ललित कलेची परीक्षा 1881 मध्ये उत्तीर्ण केली. नंतर 1884 मध्ये त्यांनी कलेचे शिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी त्यांनी बीएची परीक्षा चांगल्या पात्रतेने उत्तीर्ण केली आणि कायद्याचा अभ्यास केला.  
 
नंतर त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन इंस्टीट्यूट मध्ये  प्रवेश घेतला. बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे ते स्वामी रामकृष्ण परमहंस यांना भेटले आणि त्यांनी परमहंस यांना आपले गुरु मानले.रामकृष्ण यांनी नरेंद्र यांना दीक्षा दिली आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद केले.विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.
रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचावा या साठी रामकृष्ण मिशन देखील सुरु केले.रामकृष्ण यांनी समाधी घेतल्यावर ते भारत भ्रमणासाठी बाहेर पडले आणि कन्याकुमारी येथे पोहोचले.त्यांनी भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेचा उद्धार करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले.मातृभूमीची सेवा करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पित केले. नरेंद्र ह्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी भगवे वस्त्र धारण केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा पायीच प्रवास केला. 
 
त्यांनी आपले विचार जगभरात पोहोचावे या साठी अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मीय परिषदेत भारताचे नेतृत्व करून आपल्या सुंदर वक्तृत्वाने अमेरिकेतील लोकांची मने जिंकली.स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधु भगिनींनो असे उद्गार काढतात परिषदेत दोन मिनिटे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला .  
 
त्यांनी सर्वधर्मना धर्म आणि अत्याचारासाठी लढायचे आहे हे जगाला पटवून दिले.त्यांनी विश्वबंधुत्त्वाचे नाते निर्माण केले. उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.असे त्यांचे थोर विचार होते.'आध्यात्मवाद आणि भारतीय तत्त्वज्ञानांशिवाय जग अनाथ होईल' असं स्वामी विवेकानंदांचा दृढ विश्वास होता.त्यांनी अमेरिकेत रामकृष्ण परमहंस मिशनच्या अनेक शाखांचे स्थापन केले. अनेक अमेरिकी विद्वानांनी त्यांचे शिष्यत्व ग्रहण केले.  
 
त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत.अशा या थोर व्यक्तिमत्त्व असणारे घोर गरिबांचे सेवक स्वामी विवेकानंद यांचे 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे निधन झाले.
 
Edited By - Priya Dixit