सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:09 IST)

तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा - वरूण सरदेसाई

varun desai
"मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. पण तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत, असं वक्तव्य युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केलं.
 
परभणी येथे आयोजित युवा पदाधिकारी ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले, "सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होतं. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला आहे."
 
"यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल," असंही सरदेसाई म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.