बॉलीवूडच्या अनेक नायिकांचे या वर्षांत शुभमंगल झाले. सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या शिल्पा शेट्टीने याच वर्षी उद्योगपती राज कुंद्राच्या साथीने 'सात फेरे' घेतले.
सहा मार्च- अमृता अरोराने शकिलच्या गळ्यात वरमाला घातली. १२ जून- अंतरा माळीने जी क्यू मॅगझिनचे संपादक चे कुरीयन यांच्याशी लग्न केले. २२ नोव्हेंबर- शिल्पा शेट्टी व राज कुंद्राने अखेरीस लग्न केले. २९ नोव्हेंबर- इशा कोप्पीकरने टिम्मी नारंगबरोबर 'सात फेरे' घेतले.