शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (09:03 IST)

‘दिल बेचारा’ पहिल्या २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या २४ तासांमध्ये साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला असल्याचे समारे आले आहे.
 
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी जवळपास सोडेनऊ कोटी लोकांनी पाहिला आहे. 
 
सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी डिझनी प्लस हॉटस्टारने तो प्रीमिअम सबस्क्रीप्शन नसलेल्यांसाठीही मोफत ठेवला आहे. तरीसुद्धा टोरंट साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. प्रदर्शनाच्या काही तासांनंतर लगेचच ‘दिल बेचारा’ तमिळ रॉकर्ससारख्या टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आला. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.