शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:04 IST)

83 Movie Review : रणवीर सिंगचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 10 कोटी कमावणार!

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा चित्रपट 83 या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता एवढी आहे की, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 10 कोटींची कमाई करू शकतो. अहवालानुसार, आगाऊ बुकिंग चांगली सुरू आहे.
प्रेक्षक भावनिक पातळीवर चित्रपटाशी जोडले जात असून देशभरातील मल्टिप्लेक्सचे आगाऊ बुकिंग पाहिल्यास 15,000 तिकिटे बुक झाली आहेत. या गणितानुसार हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 10 कोटींची कमाई करू शकतो. 
चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान म्हणाले, ' 83 ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मला माहित आहे की मी जर चित्रपटाची योग्य निर्मिती केली नाही तर हा देश मला माफ करणार नाही. रणवीर सिंगच्या बाबतीतही असेच होते.
कबीर खान म्हणाले, 'रणवीरला वाटत होते की जर त्याने कपिल देवची भूमिका नीट केली नाही तर लोक त्याला माफ करणार नाहीत. त्याने त्याचे काम किती चोखंदळपणे केले आहे, हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्याने खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणवीर सिंगच्या कामाचे कौतुक सुरू झाले आहे.