अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमधून आलिशान कार चोरीला गेली
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई येथे बास्टियन ॲट द टॉप नावाच्या रेस्टॉरंटच्या आवारात पार्क केलेली एक आलिशान कार चोरीला गेली आहे. जी जेवण करणाऱ्यांपैकी एकाची होती.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चोरीला गेलेले वाहन BMW Z4 आहे, ज्याची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. असे सांगितले जात आहे की, मालक व्यावसायिक असून ज्याने आपली कार चोरीला गेल्यानंतरएफआयआर दाखल केली.
तसेच अधिकारींनी सांगितले की, “BMW च्या मालकाने कारची चावी रेस्टॉरंट कर्मचाऱ्याला दिली होती. रेस्टॉरंट बंद झाल्यावर तो खाली आला. त्यांनी रेस्टॉरंट पार्किंग कर्मचाऱ्यांना त्यांची कार आणण्यास सांगितले. त्याची कार पार्किंगमधून गायब झाल्याचे समजल्याने त्याला धक्का बसला. यानंतर BMW च्या मालकाने बिल्डिंग कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले, त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्याची BMW Z4 अज्ञात व्यक्तींनी चोरल्याचे स्पष्ट झाले.पुढील तपास सुरु असल्याचे अधिकारींनी सांगितले आहे.
Edited By- Dhanashri Naik