शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (14:03 IST)

आमिरचे 30 वर्षांत दोन लग्न मोडले, लगान चित्रपटाच्या सेटवर राजघराण्याची मुलगी आवडली होती

आमिर खान आणि किरण राव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 15 वर्षांपूर्वी लग्न केले. आमिर आणि किरण यांनी त्यांच्या विभक्ततेबाबत संयुक्त निवेदन जारी केले. ते म्हणाले की आमचे व्यावसायिक संबंध कायम राहतील. याशिवाय आम्ही एकत्र मुलाची काळजीही घेऊ.
 
अशा प्रकारे दोघांची भेट झाली
किरण राव यांनी आमिर खान स्टारर फिल्म 'लगान' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. यानंतर किरणने त्यांना आशुतोषच्या 'स्वदेश' या चित्रपटात देखील मदत केली. किरणने ‘दिल चाहता है’ या चित्रपटातही कॅमिओची भूमिका साकारली होती. लगान दरम्यान किरण रावची आमिर खानशी प्रथम भेट झाली.
 
दुसर्‍या बाजूला आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. आमिर खानने बालपणातील मित्र रीनाशी लग्न केले आणि त्यानंतर लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट झाला. किरण राव घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर आमीरच्या आयुष्यात आल्या.
 
किरण राव बद्दल आमिर खानने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, लगान या चित्रपटाच्या वेळी किरण माझ्या टीमची सदस्य होती. त्यावेळी ती सहाय्यक संचालक होती. रीनापासून घटस्फोटानंतर किरणची भेट झाली, त्यावेळी ती माझी चांगली मैत्रिण सुद्धा नव्हती, घटस्फोटानंतर मी मानसिक आघात सहन करत होतो. दरम्यान, एक दिवस किरणचा फोन आला.
 
आमीर पुढे म्हणाला, 'मी किरणशी जवळपास अर्धा तास बोललो. मला तिच्याशी बोलून चांगलं वाटत होतं. त्या कॉलनंतर आम्ही एकमेकांना डेट करण्याचे ठरवले. बरीच मैत्रीनंतर मला असं वाटलं की तिच्याशिवाय माझं आयुष्य नाही. तर मग काय आमच्या नात्याला नवीन नाव दिले आणि मग 2005 साली आमचे लग्न झाले.
 
आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि आमिर खानची पत्नी किरण राव राजघराण्यातील आहेत. त्यांचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी आता तेलंगणा राज्यात आहे. किरण राव अदिती राव हैदरी यांची बहीण आहे. ती देखील राजघराण्यातील आहे. आमीर आणि किरण यांना एक मुलगा आझाद राव खान आहे.