रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (11:24 IST)

आमिर खानची मुलगी आयराचा साखरपुडा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडते.आयराचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात.आयरा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्ट देखील करते आणि दरम्यान तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आयराने तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केल्याचे वृत्त आहे.आयराने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड तिला खूप रोमँटिक स्टाईलमध्ये प्रपोज करत आहे आणि तिला अंगठी घालत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 
 आयराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ एका स्पोर्ट्स इव्हेंटचा आहे, जिथे नूपूर येते आणि सर्वांसमोर गुडघ्यावर बसून आयराला प्रपोज करतो.जेव्हा आयरा हो म्हणते तेव्हा नुपूर तिला अंगठी घालतो आणि त्यानंतर दोघे चुंबन घे त आहे .आयरा आणि नुपूरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहत्यांसह सेलेब्सनाही तो आवडला आहे.
 
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'पोपाइ - तो म्हणाला हो, इरा - ही ही मी हो म्हणाली Popeye: She said yes, Ira: Hehe I said yes).'आयरा प्रेमाने नुपूरला पोपई म्हणत असल्याचे या कॅप्शनवरून समजते. काही सेलिब्रिटींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून   सारा तेंडुलकर, रिया चक्रवर्ती, आरजे आलोक, हुमा कुरेशी, सिद्धार्थ मेनन आणि हेजल कीच इत्यादींनी देखील व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.