शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:07 IST)

कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सलमान खानच्या मेव्हण्यासोबत

aayush-sharma-calls-her-kwatha-co-star-isabelle-kaif
अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सलमान खानच्या मेव्हण्यासोबत, आयुष शर्मासोबत बॉलिवूड डेब्यू करणार आहे. इसाबेलचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर आयुष शर्माचा बॉलिवूडमध्ये हा दुसरा चित्रपट असणार आहे.
 
आयुष शर्मा आणि इसाबेल कैफ 'क्वाथा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण बुतानी करत आहेत. आयुष हा चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'क्वाथा' चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असणार आहे. 'क्वाथा' भारत आणि म्यानम्यार सीमेवरील एक गाव आहे. गेल्या वर्षभरापासून आयुष शर्मा त्याच्या शरीरावर मेहनत घेत होता. 'लवयात्री'मध्ये चॉकलेट बॉय लूकमध्ये दिसलेला आयुष शर्मा या चित्रपटातून अतिशय वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.