1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (08:55 IST)

अभिनेता रजनीकांत चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी दाखल, चाहते अस्वस्थ

Actor Rajinikanth admitted to Cauvery Hospital in Chennai for checkup
सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत हेल्थ चेकअपसाठी चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तिथे त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते अस्वस्थ झाले आहेत आणि सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
 
ANI न्यूज एजन्सीच्या ट्विटनुसार, रजनीकांत हेल्थ चेकअपसाठी चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये गेले होते, त्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले आहे. राजनीकांतचे पीए रियाझ के अहमद यांनी सांगितले, 'ही नियमित आरोग्य तपासणी आहे. ते सध्या खासगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल आहेत.

ही बातमी कळल्या पासून अभिनेता रजनीकांत चे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. चाहत्यांना अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल लवकरात लवकर जाणून घ्यायचे आहे. सोशल मीडियावर चाहते रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत पोस्ट करत आहेत.
 
रजनीकांत यांना सोमवारी दादासाहेब फाळके पुरस्काराने(Dada Saheb Phalke Award) सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या पूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रक्तदाबाच्या समस्येमुळे त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र, दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.