सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:31 IST)

'83' चित्रपटात आदिनाथ दिसणार 'या' क्रिकेटरच्या भूमिकेत

सध्या 83 चित्रपटाची चर्चा आहे, आणि या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्यात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसत आहे. नुकत्याच, 83 च्या निर्मात्यांकडून सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी ताहिर राज भसीन, के. श्रीकांत यांच्या भूमिकेसाठी जीवा, मोहिंदर अमरनाथ यांच्या रूपात साकिब सलीम, यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत जतिन सरना, संदीप पाटील यांच्या रूपात चिराग पाटील, कीर्ती आजाद यांच्यासाठी दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांच्या भूमिकेसाठी निशांत दहिया, मदन लाल यांच्यासाठी हार्डी संधू आणि सैयद किरमानी यांच्यासाठी साहिल खट्टर तसेच, बलविंदर सिंह संधू यांच्या भूमिकेसाठी एम्मी विर्क यांचे फर्स्ट क पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या दिग्गज नावांमध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी आदिनाथ कोठारे यांच्या नावाची वर्णी लागली आहे. चित्रपटातील कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह यांच फर्स्ट लूकने 83 विषयीची दर्शकांची उत्कंठा वाढवलेली असताना यात आणखी एक नाव आता जोडले गेले आहे.