रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

17 वर्षांनंतर ऐश्वर्यासोबत दिसणार अनिल कपूर

लवकरच फॅनी खान या चित्रपटातून ऐ दिल है मुश्किल या चित्रपटानंतर ऐश्वर्या राय- बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल. ऐश्वर्यासह या चित्रपटात मुख्य भूमिकेत अनिल कपूर दिसणार आहेत. ऐश्वर्या आणि अनिल तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
 
ऐश्वर्या आणि अनिल कपूरने या आधी सुभाष घई यांच्या ताल आणि सतीश कौशिक यांच्या हमारा दिल आपके पास है या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ही माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून दिली. ऑगस्टामध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.