1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:39 IST)

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

ajay devgn
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अजय देवगनने ट्विटरवर मोठा खुलासा केला आहे. एका संकेतस्थळावर २८ मार्च रोजी काजोल आणि मुलगी न्यासा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी प्रकाशित झाली होती.

मात्र ही बातमी खोटी आणि निराधार असून काजोल आणि न्यासा एकदम ठिक असून काळजी करु नका, असे ट्विट अजय देवगनने केले आहे.