सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (10:56 IST)

काजोलची 'ही' गोष्ट खूप 'इरिटेट' करते; अजयचा 'खुलासा'

बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि दोघांमध्ये आजही खूप प्रेम दिसत आहे. दोघांनीही एकमेकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी स्वीकारले आहेत. अशात अजयनं काजोलची कोणती गोष्ट त्याला आवडत नाही याचा खुलासा केला आहे. अजय देवगण सांगतो की, काजोलचं प्रमाणापेक्षा जास्त बोलणं त्याला खूप इरिटेट करतं. परंतु जेव्हा काजोल जास्त बोलत नाही तेव्हा अजय ते मिस करतो असंही त्यानी म्हटलं आहे. 
 
अजय म्हणतो, ती सेटवर खूप बोलत असते. जर तुम्ही तिला कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं तर त्यावेळी 'ती काहीतरी वेगळंच करत असेल. मी तिच्या जास्त बोलण्याला घेऊन तक्रार करत असतो. परंतु जेव्हा ती गप्प असते तेव्हा मी तिला विचारत असतो, काय झालं. त्यामुळे मला हे काहीच बदलायचं नाही.' अजय पुढे म्हणतो, ती चांगली कलाकार आहे हे सर्वांना माहिती आहे. अ‍ॅक्टर म्हणून तिच्या सोबत काम करताना मला नेहमीच मजा आली आहे. ती माझी पत्नी आहे आणि ती मला जास्त कंफर्टेबल होऊ देतो. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अजय देवगण लवकरच तानाजी या आगामी सिनेमात तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात काजोलही त्याच्यासोबत काम करताना दिसणार आहे.