मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (08:38 IST)

अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चे ऑगस्ट महिन्यात शूटिंग सुरू

अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे ऑगस्ट महिन्यात शूटिंग सुरू होत असल्याची माहिती अक्षयने दिली आहे.‘बेल बॉटम’ या चित्रपटातील मुख्य स्टार कास्टबरोबरचा फोटो अक्षयने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरेशी, निर्माता जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक रणजित तिवारी दिसत आहेत. पुढच्या महिन्यात ‘बेल बॉटम’च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
 
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून हुमा कुरेशी आणि लारा दत्ता देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा असीम अरोडा आणि परवीज शेख यांनी लिहिली आहे. चित्रपटच्या पहिल्या शेड्यूलची शूटिंग ब्रिटनमध्ये होणार आहे. पुढच्या वर्षी २ एप्रिला रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
८०च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित ‘बेल बॉटम’ चित्रपट आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अक्षय डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अक्षय कुमारने या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित केला होता. ‘बेल बॉट’ या चित्रपटाची निर्मिती वाशु आणि जॅकी भगनानी सोबत निखिल अडवाणी देखील करत आहे.