मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (12:19 IST)

आलियाची सेल्फी क्वीन मैत्रीण ज्युनिपर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हारल होणार्याध फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी आलिया चक्क एका मांजरीमुळे चर्चेत आहे. हो, आलियाच्या घरी एक सुंदर मांजर आली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिने या क्यूट मांजरीची तोंडओळख करुन दिली. आलियाने इन्स्टाग्रामवर या मांजरीसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. आता आमचं त्रिकूट पूर्ण झाले.
 
आमच्या नवीन बाळाला भेटा. हिचं नाव ज्युनिपर आहे. हिचे विशेष  गुण म्हणजे तिला सेल्फी काढायला फार आवडतात. अशा आशयाची कॉमेंट तिने केली आहे. आलियाने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी आलिया ऑस्कर पुरस्कारामुळे चर्चेत होती.