शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 20 एप्रिल 2022 (13:19 IST)

अल्लू अर्जुनने तंबाखू कंपनीची ऑफर फेटाळली ;चाहत्यांकडून अर्जुनचे कौतुक

allu arjun
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने तंबाखू कंपनीच्या जाहिरातीची ऑफर धुडकावून लावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने अल्लूला करोडो रुपयांची ऑफर दिली होती. अल्लूला त्याच्या चाहत्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार करायचा नाही. अल्लू स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही. या कारणास्तव त्यांनी तंबाखू कंपनीच्या ब्रँडची जाहिरात देण्यास नकार दिला.
 
अल्लूच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की चित्रपटात धूम्रपान करणे अल्लूच्या हातात नाही, परंतु तो प्रयत्न करतो की कोणीही त्याचे सेवन करू नये. ते टाळण्याचा संदेशही देतो.
 
अल्लूच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, तंबाखूची ही जाहिरात पाहून त्यांच्या चाहत्यांनी असे पदार्थ खायला सुरुवात करावी असे त्यांना वाटत नाही, ज्यामुळे त्यांना त्याचे व्यसन होते. ते स्वतः जे सेवन करत नाहीत, त्याचा प्रचार कशाला करतात, असा त्यांचा समज आहे.या मुळे चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.