1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (22:29 IST)

अमूलकडून हृदयस्पर्शी श्रद्धांजली

Amul tribute to irrfan khan and rishi kapoor
अभिनेता इरफान खानने आणि अभिनेते ऋषी कपूर यांना सर्वच स्तरांतून दोघांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अमुल कंपनीकडून ऋषी कपूर आणि इरफान खानला हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.  
 
अमुल कंपनीने या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मेरा नाम जोकर', 'सरगम' आणि 'अमर अकबर एंथनी' या चित्रपटातील भुमिका ऍनिमेशनच्या मध्यमातून जिवंत केल्या आहेत.
 
ऋषी कपूर यांचा १९७७ साली प्रदर्शित झालेला "आप किसी से कम नहीं" चित्रपटाच्या नावाच्या आधारावर या जाहिरातीला टॅगलाईन देण्यात आली आहे. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्याकाळी "आप किसी से कम नहीं" चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. 
 
अमुल कंपनीची ही कल्पना चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. शिवाय अभिनेत्री आलिया भट्टने हा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.
 
तर दुसरीकडे इरफान खानला श्रद्धांजली देण्यासाठी 'द लंचबॉक्स', 'अंग्रेजी मीडियम', आणि 'पान सिंह तोमर' या चित्रपटांमधील भुमिकांचा वापर केला आहे.