1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 30 एप्रिल 2020 (22:30 IST)

नवा विक्रम : TikTok डाउनलोड करणाऱ्यांची संख्या आता तब्बल 2 अब्जहून जास्त

TikTok downloads 2 billion
लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप TikTok ने एक नवीन विक्रम केलाय. TikTok डाउनलोड करणाऱ्यांची संख्या आता दोन बिलियन म्हणजे तब्बल 2 अब्जहून जास्त झाली आहे. ‘सेन्सर टॉवर’च्या रिपोर्टनुसार ‘बाइटडान्स’ची मालकी असलेल्या सोशल व्हिडिओ अ‍ॅप TikTok ला जगभरातील अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर दोन बिलियनपेक्षा अधिक वेळेस डाउनलोड करण्यात आले आहे.
 
31 मार्चला संपलेल्या तिमाहीत हे अ‍ॅप 315 मिलियन युजर्सनी डाउनलोड केलं. तर, याच कालावधीत फेसबुकची मालकी असलेले लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोडच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या तिमाहीत जवळपास 250 मिलियन डाउनलोड व्हॉट्सअ‍ॅपला मिळाले. यासोबत, टिकटॉकने 2018 मधील चौथ्या तिमाहीत झालेल्या 205 मिलियन डाउनलोडचा स्वतःचा रेकॉर्डही मोडला.
 
विशेष म्हणजे एकूण डाउनलोडच्या तुलनेत TikTok ला एकट्या भारतातून 611 मिलियन डाउनलोड मिळालेत. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनमध्ये या अ‍ॅपला 196 मिलियन डाउनलोड मिळालेत. चीनमध्ये TikTok ला Douyin नावाने ओळखलं जातं. TikTok डाउनलोड करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत हे अ‍ॅप 165 मिलियन वेळेस डाउनलोड करण्यात आले आहे.