बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप

अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. चित्रपट निर्माता अजय कुमार सिंह यांनी 2 कोटी 5 लाखांची रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अमीषा पटेलवर केला आहे. त्यामुळे अमीषाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  फसवणूक झाल्याप्रकरणी निर्माता अजय सिंह यांनी कोर्टात धाव घेतली.
 
अमीषाने चित्रपट ‘देसी मॅजिक’साठी निर्मात्याकडून 3 कोटी रुपये उसने घेतले होते. त्यानंतर अमीषाने निर्मात्याला पैसे चेकच्या माध्यमातून परत केले. पण चेक बाऊन्स झाल्यामुळे निर्मात्याने अमीषासोबत संपर्क साधला. सतत संपर्क साधूनही समोरुन उत्तर न आल्याने अजय सिंह यांनी अमीषाविरोधात तक्रार दाखल केली.
 
“मी बऱ्याचदा अमीषाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिने काही उत्तर दिले नाही. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे समजल्यावर मी गुन्हा दाखल केला”, असं अजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.