गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (18:12 IST)

करणच्या शोसाठी मी लायक नाही : अनन्या

ananya pande
स्टुडंट ऑफ द इअर-2 द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अनन्या पांडे कॉफी विथ करण-6 च्या आगामी एपिसोडमध्ये दिसून येणार आहे. खरेतर आता अनन्याचे म्हणणे आहे की, अद्याप तिने असे काहीही खास केले नाही त्यामुळे ती या चॅट शोमध्ये जाण्याच्या लायक नाही. करण जौहरचा टॉक शो कॉफी विथ करण-6 मागील काही काळापासून चर्चेत आहे. आता त्याचा चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर-2 ची स्टार कास्ट टायगर श्रॉफ, अनन्या पांडे व तारा सुतारिया लवकरच करणच्या समोर काऊचवर बसलेले दिसून येतील. या एपिसोडचा प्रामो रिलीज झाला आहे. अनन्याने म्हटले आहे की, आपण या शोमध्ये असता कामा नये, या लोकांच्या मताशी मी सहमत आहे. अद्याप मी असे काही खास केलेले नाही व आपण या शोमध्ये येण्याच्या लायक नाही, असेही अनन्याने स्पष्ट केले आहे.