गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (11:25 IST)

माधुरी- आमिरच्या 'दिल'चा सीक्वलही येणार

Madhuri
नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरलेल्या 'दिल' चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे. माधुरी दीक्षित, आमिर खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खूपच गाजला होता. माधुरी-आमिरच्या केमिस्ट्रीसोबतच या चित्रपटातली गाणी देखील सुपरहिट ठरली होती. या चित्रपटाचा सीक्वल काढण्याचा मानस दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी बोलून दाखवला आहे. 'टोटल धमाल' या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'दिल'चा सीक्वल काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सीक्वलचं नाव 'दिल अगेन' असेल असंही ते म्हणाले. चित्रपटाची कथा अजून निश्चित झाली नाही मात्र चित्रपटाचा सीक्वल नी येईल असं सांगत त्यांनी चाहत्यांना आश्वस्त केलं आहे. या चित्रपटात माधुरी-आमिर ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार की नवीन जोडी या दोघांची जागा घेणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचा तेलुगू, कन्नड भाषेत रिमेकही करण्यात आला होता. या दोन्ही भाषेतील चित्रपटांनादेखील तेवढीच तुफान प्रसिद्धी लाभली होती.