रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मगराचा मृत्यू, गावकरी बांधणार मंदिर, करतील पूजा

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यात ग्रामीण आणि वन्य जीव यांच्यातील मैत्री एक उत्तम उदाहरण मांडते. येथे ग्रामीणांचा मित्र झालेल्या मगर गंगारामचा मृत्यू झाला असून आता गावकरी त्याचे मंदिर बांधण्याच्या तयारीत आहे.
 
बेमेतरा जिल्हा मुख्यालयाहून सुमारे 7 किमी लांबीवर बावा मोहतराचे गावकरी सध्या एका मगराचा मृत्यू झाल्याने दुखी आहे. गंगाराम नावाचा मगर गावकर्‍यांचा सुमारे 100 वर्षापासून मित्र होता. मित्र असा की तलावात असून देखील मुलं तेथे त्यासोबत पोहायचे.
 
गावाचे सरपंच मोहन साहू सांगतात की ‘गावाच्या तलावात मागील 100 वर्षापासून मगर राहत होता. या महिन्याच्या 8 तारखेला त्याचा मृत्यू झाला. गावकर्‍यांसाठी तो इतका जीवलग होता की त्याचा मृत्यू झाल्या त्या दिवशी गावात कोणाच्याही घरी अन्न शिजवले गेले नाही.
 
सुमारे 500 ग्रामीण त्याच्या अंत्यसंस्कारात सामील झाले आणि सन्मान आणि विधिपूर्वक त्याला तलावा किनारी दफन केले गेले. आता त्याचं मंदिर बांधण्याची तयारी आहे जिथे लोकं पूजा करू शकतील.
 
या मगराचे वय 130 वर्ष होते आणि त्याचा मृत्यू नैसर्गिक होता. गंगाराम पूर्ण विकसित नर मगर होता. त्याचं वजन 250 किलोग्राम होतं आणि लांबी 3.40 मीटर. तसं तर मगर मासांहारी जीव असतो परंतू तलावात स्नान करताना त्याने कधीच कोणालाही नुकसान केले नाही म्हणूनच त्याचा मृत्यू गावकर्‍यांना दुखी करून गेला.