बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (08:58 IST)

राहुल गांधी यांना महिला आयोगाची नोटीस

राफेल विमान खरेदी प्रक्रियेवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्‍या टीकेमुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. पंतप्रधान एका महिलेच्या मागे लपत आहेत, असे वक्‍तव्य राहुल गांधींनी केले होते. त्‍यांच्या याच वक्‍तव्यावरुन राष्‍ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांनी एका रॅलीला संबोधीत करताना नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘‘राफेल मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी पळ काढत आहेत आणि बचावासाठी संसदेत एका महिलेला पुढे करत आहेत’ अशी टीका राहुल यांनी केली होती.