सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (17:55 IST)

रणबीर-आलियाचे डिसेंबरमध्ये लग्न?

सध्या बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कॅफच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच आता डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, येत्या डिसेंबरमध्ये रणबीर आणि आलिया लग्न करू शकतात. बॉलिवूडमधील क्युट कपल पैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. बऱ्याच काळापासून रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे रणबीर आणि आलिया कधी लग्न करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागून होत.
 
रणबीर आणि आलियाने अनेक प्रोजेक्टवरील काम पुढे ढकलले आहे. माहितीनुसार रणबीर डिसेंबरमध्ये संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘एनिमल’ चित्रपटात काम करण्यास तयार होता. परंतु रणबीरने आता या चित्रपटातील काम रिशेड्यूल केले आहे. पुढच्या वर्षी रणबीर या चित्रपटाचे शूटिंग करेल. तसेच आलियाने शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसमधील ‘डार्लिंग्स’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. वर्षाच्या शेवटी आलिया फक्त ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे प्रमोशन करेल. तसेच ‘पुकार’ चित्रपटाची असाइमेंट पूर्ण झाल्यानंतर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलिया काम करेल.
 
रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत आलियाची आई सोनी राजदानने प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॉल माय एजेंट’ या वेबसीरिजच्या प्रमोशन दरम्यान बॉलिवूड लाईफच्या मुलाखती दरम्यान सोनी राजदानला आलियाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, ‘मला काहीच माहित नाही आहे, लग्न केव्हा आहे. मी पण याची वाटत पाहत आहे.’