testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मणिकर्णिकातून अंकिता लोखंडेचे बॉलिवूडमध्ये पर्दापण

ankita lokhande
Last Modified मंगळवार, 4 जुलै 2017 (17:33 IST)

अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच मणिकर्णिका या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.

मणिकर्णिका या आगामी चित्रपटातून ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतसोबत ती स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे. अंकिताने पवित्र रिश्‍ता या मालिकेतील आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.पवित्र रिश्‍ता मालिका बंद झाल्यापासून अंकिताची बॉलीवूडमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. काही दिवसांपूर्वीच ती संजय दत्तच्या मलंग या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची चर्चा होती. अखेर मणिकर्णिकाच्या निमित्ताने अंकिता आता नवी इनिंग सुरू करणार आहे. या चित्रपटातून पदार्पण करत असल्याच्या वृत्तालाही तिने दुजोरा दिला असून आपल्या नव्या इनिंगबाबत आपण खूप उत्सुक असल्याची प्रतिक्रीया तिने व्यक्त केली.यावर अधिक वाचा :