बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 7 एप्रिल 2021 (12:55 IST)

अर्जुन-मलायका लवकरच अडकणार विवाह बंधनात?

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा अभिनेत्री मलायका अरोरासोबत रिलेशनमध्ये आहे. बॉलिवूडमधील हे कपल कायम चर्चेत असते. ते दोघं लग्र करणार असल्याच अफवाही अनेकदा उठल्या आहेत. दरम्यान आताही अर्जुन कपूरच्या एका फोटोमुळे पुन्हा त्यांच्या लग्राची चर्चा रंगू लागली आहे.
 
याचं कारण म्हणजे अर्जुनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो. अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे. हा फोटो पाहून हे मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना?
 
अर्जुन-मलायका लग्र तर करत नाहीत ना? असाच प्रश्र्न चाहत्यांना पडत आहे. पण या मंगळसूत्रासोबत आपले पर्सनल कनेक्शन आहे, असे सांगत खुद्द अर्जुननेच या मंगळसूत्राचे सिक्रेटही या पोस्टमध्ये सांगितले. अर्जुन म्हणाला,  'की अँड का' या चित्रपटातील आठवणीत राहिलेला हा फोटो. चित्रपटाचा सेट आणि चित्रपटातील की दोघांनाही मिस करतो आहे. मी माझ्या आईच्या इच्छेखातर हा चित्रपट स्वीकारला होता. त्यामुळे ती माझी खासगी बाब आहे आणि आता बेबो आणि बाल्कि सरांसोबत काम केल्यानंतर तर ती अधिक खासगी झाली आहे. मला वाटतं या चित्रपटाचा सिक्वल तयार करायला हवा. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संदीप और पिंकी फरार चित्रपटात अर्जुन आणि परिणिती चोप्रा यांची जोडी झळकली होती. याशिवाय भूत पोलीस, सरदार का ग्रँडसन आणि एक व्हिलन रिटर्न्स आदी चित्रपटात तो व्यस्त आहे.