शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:18 IST)

लतादीदी रुग्णालयात, प्रकृती स्थिर, चिंतेचे कारण नाही

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं जात आहे.
 
एता मंगेशकर यांची बहिण आणि गायिका उषा मंगेशकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काळजीचं काहीही कारण नाही. लता मंगेशकर यांना व्हायरल इनफेक्शन झालं आहे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. चिंता करण्याची गरज नाही असं उषा मंगेशकर यांनी म्हटलं आहे. लवकरच लतादीदीना डिस्चार्ज  मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितल आहे.