गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (15:40 IST)

सोनाक्षी सिन्हावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी एकाला अटक

Aurangabad news
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी औरंगाबादमधून एका २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर पोलिसांनी सोनाक्षी सिन्हानं तक्रार दिल्यानंतर ही कारवाई केली.
 
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस प्रॉम्प्ट अॅक्शन अगेन्स्ट हॅरॅसर्स’ या हॅशटॅगनं एक चित्रफित शेअर केली होती. विशेष मोहीम तिनं राबवली. मात्र, या चित्रफितीवरून औरंगाबाद येथील शशिकांत जाधव या तरुणानं वादग्रस्त टिप्पणी केली. या तरुणानं टिप्पणी करताना इतर कलाकारांबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली.
 
या प्रकरणी सोनाक्षी सिन्हाने ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं याची गंभीर दखल घेत प्रकरणी कारवाई केली. तरुणाविरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधात्मक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.