शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (08:53 IST)

मुंबईत N 95 चे बनावट मास्क विक्री करणाऱ्या आरोपीला अटक

कोरोना संकटांच्या काळात अनेक दुकानदारांपासून ते हॉस्पिटल पर्यंत अनेकजण गैर मार्गानं खिसे भरले जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यातलीच एक घटना म्हणजे मुंबईत एन ९५ मास्कच्या नावान अनेक बनावट मास्क विकले जात आहेत. अशाच एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
 
कोरोनापासून खबरदारीचे उपाय म्हणून नागरिक सॅनिटायझर, मास्कची खरेदी करतात. पण या संकटातही सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. क्राइम ब्रँचच्या युनिट ३ च्या पथकानं बनावट एन ९५ मास्क (N 95 Mask) विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपये किंमतीचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.
 
सफदर हुसैन मोमिन असं या आरोपीचं नाव आहे. डीसीपी अकबर पठाण आणि निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे बनावट मास्क जप्त केले आहेत.
 
व्हिनस कंपनीच्या नावाखाली हे मास्क तयार करून विकले जात होते. याबाबत कंपनीला माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर पोलिसांनी गोदामावर छापेमारी केली. या कंपनीचे एन ९५ मास्क हे देशभरातील अनेक रुग्णालये आणि अन्य ठिकाणी डॉक्टरांकडून वापरले जात आहेत.