शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (06:25 IST)

देर आये दुरुस्त आये, पूर्ण देशाला न्याय मिळाला: निर्भयाची आई

20 मार्च हा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. आजच्या दिवशी निर्भयाचाच विजय झालेला नाही तर तिच्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाचा विजय झाला आहे असं निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.
 
माझी मुलगी आता सोबत नाही तरी ही सात वर्षाची लढाई त्या गुन्ह्याविरोधात होती. निर्भयाला मी वाचवू शकले नाही याचं मला वाईट वाटतं आहे. दुःखही होतं आहे मात्र तिला न्याय मिळाला याचं मला समाधान आहे.
 
तिच्यामुळे निर्भयाची आई म्हणून माझी ओळख निर्माण झाली, हे अभिमानास्पद आहे. ही जीत मिळाल्यावर मी निर्भयाच्या फोटोला मिठी मारली, तिला न्याय मिळाला, पण तिला वाचवू शकलो नाही याचं वाईट वाटतंय, असं तिची आई म्हणाली. 
 
अखेर आरोपींना फाशी मिळाली आणि माझ्यासमोर माझी मुलगी मृत्यूला झुंज देत असतानाचा दृश्य डोळ्यासमोर येऊ लागला, असं म्हणत तिच्या वडीलांना गहिवरुन सांगितले.