testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना मारहाण

Last Modified मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (17:10 IST)

कॉमेडियन कपिल शर्मा शोची ऑनस्क्रिन पत्नी सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना मारहाण झाली आहे.

मुंबईत सुमोनाच्या वडिलांवर एका रिक्षा चालकाने हात उचलला. या मारहाणीत त्यांना दुखापत झाली असून डोक्याला जबर मार लागला आहे.
याप्रकरणी
पवई पोलीस ठाण्यात अमित गुप्ता या रिक्षा चालकावर कलम ३२४, ३३७, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

सुमोनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मी आणि माझं कुटुंबीय अंधेरीत सेवन हिल्स रुग्णालयाच्या शेजारी राहतो. माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. माझे वडील आईला रुग्णालयात घेऊन जात होते. एकही रिक्षावाला रुग्णालयापर्यंत जाण्यास तयार नव्हता. खूप वेळानंतर एका रिक्षा थांबली पण आमची अडचण पाहून त्याने जास्त पैसे मागितले. माझ्या बाबांनी ते देण्यास नकार दिला.रागावलेल्या रिक्षावाल्याने तिच्या वडिलांच्या डोक्यात दगड घातला. त्याने बाबांना अनेक मुक्के मारले आणि धक्का दिला. दगड लागल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. माझ्या आईने एक वाहनाला थांबवून त्यात वडिलांना रुग्णालयात नेले.यावर अधिक वाचा :

गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...

national news
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...

national news
दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

national news
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...