शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (11:47 IST)

प्रदर्शनाआधीच 'बागी 3'चा विक्रम

अ‍ॅक्शनस्टार टायगर श्रफचा 'बागी 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुामाकूळ घालत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 72 तासांत 'बागी 3' चा ट्रेलर सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळून तब्बल 10 कोटी वेळा पाहिला गेला आहे. भारतीय इतिहासात आजवर कुठल्याही चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला नव्हता. गमतीशीर बाब म्हणजे केवळ युट्यूबवरच्या गेल्या 24 तासात पाच कोटी वेळा हा ट्रेलर पाहिला गेला.
 
यावरुन आपल्याला या चित्रपटाबाबत प्रेक्षक किती उत्सुक आहेत याचा अंदाज येतो. या अफाट प्रमोसाठी टायगर श्रॉफने ट्विट करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'बागी' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खानने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर मार्च 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 253 कोटींची कमाई केली होती.