testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेता पी सुब्बाराजूची चौकशी

'बाहुबली - द कन्क्ल्यूजन' चित्रपटात दिसलेला अभिनेता पी सुब्बाराजू हैदराबादमधील एका ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकला आहे.
पी सुब्बाराजू याने 'बाहुबली - द कन्क्ल्यूजन' चित्रपटात रवी वर्माची भूमिका निभावली होती. ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एक्साइज अॅण्ड प्रोहिबिशन डिपार्टमेंटच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पी सुब्बाराजूची चौकशी केली आहे.
उत्पादन शुल्क अंमलबजावणी विभागाचे डायरेक्टर अकुन सभरवाल यांनी सांगितलं की, 'पी सुब्बाराजू चौकशीत आम्हाला पुर्णपणे सहकार्य करत असून चौकशी अद्याप सुरु आहे'. त्यांनी सांगितलं की, तेलगू अभिनेता तरुण कुमार आणि मुमैथ खानची देखील चौकशी केली जाणार आहे. दोन्ही अभिनेते विशेष तपास पथकासमोर हजर होणार आहेत.


यावर अधिक वाचा :