testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रेखा झाली 63 वर्षांची!

rekha
मुंबई| वेबदुनिया|
'इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों है' असे 'उमराव जान'च्या मनमोहन रूपात गाणार्‍या रेखाचे आजही तितकेच मस्ताने आहेत. अजूनही रेखामध्ये 'खुबसुरत'ची चुलबुली कन्या आहे.
हृतिक रोशनच्या आजीच्या भूमिकेत जरी ती आता पडद्यावर दिसत असली तरी तमाम प्रेक्षकांसाठी आजही ती अमिताभसमोर 'सब कहते है मैने तुमको दिल दे दिया' गाणारी रेखाच आहे! वयाच्या हिशेबात रेखान आज (मंगळवारी) 63
वर्षांचा पल्ला गाठला. मात्र रेखाच्या उत्साहाला आणि सौंदर्याला कधी काळाचा निष्ठूर स्पर्श होईल असे वाटते का? दाक्षिणात्य सुपरस्टार जेमिनी गणेशन व पुष्पावली यांची कन्या म्हणून या भानुरेखाने 10 ऑक्टोबर ला जन्म घेतला. बरीच वर्षे आ‍पण रेखाचे पिता आहोत ही ओळख जेमिनी यांनी लपवली होती आणि त्याचे शल्य तिच्या मनात शेवटपर्यंत राहिले.
> > त्यामुळे चित्रपटसृष्टीत आल्यावरही तिने आपण 'गणेशन' आहोत याचा डंका पिटवला नाही. 'रंगुला रत्नम' या तेलगु चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केल्यावर 1970मध्ये रेखाने 'सावन भादो' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळेची काळी, गोलमटोल रेखा नंतर आमुलाग्र बदलली. सजा (1972), आलाप (1977), मुकद्दर का सिकंदर (1978), सिलसिला (1971), मेहंदी रंग लाएगी (1982), रास्ते प्यार के (1982), सौतन की बेटी (1989), यासारखे अनेक हिट चित्रपट तिने दिले. अमिताभ बच्चनच्या हिट चित्रपटांच्या यादीत हिरोईन म्हणून अनेक चित्रपटात रेखाच समाविष्ट आहे. आजही 'कैसी पहेली है जिंदगानी' म्हणत लडिवाळ चाळे करीत पडद्यावर येणारी रेखा तितकीच उत्साही वाटते.


यावर अधिक वाचा :

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...

'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

national news
लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या ...

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

national news
सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या ...

'ठाकरे'मध्ये माँसाहेबांची भूकिासाकारणार अमृता

national news
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ...

कॉमेडी सर्कस पुन्हा एकदा सुरु

national news
कॉमेडी सर्कस या शोने चार वर्षापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा ...