मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (19:35 IST)

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान अभिनित दबंग 3 ची शूटिंग झाली सुरू

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान अली अब्बास जफरच्या चित्रपट भारतची शूटिंग पूर्ण केल्यानंतर आपल्या नवीन प्रकल्पामध्ये व्यस्त आहे. सलमानने आपल्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'दबंग 3' ची शूटिंग सुरू केली आहे. ही माहिती सलमानने आपल्या सोशल मीडिया खात्याद्वारे दिली आहे.
 
सलमान खानने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यात भाऊ अरबाज खान देखील दिसला, सलमान खानने सांगितले की अरबाज आणि मी इंदूर येथे पोहोचलो आहोत, जेथे आम्ही जन्मलो होतो. आम्ही आता 'दबंग 3' ची शूटिंग सुरू करण्यासाठी मंडळेश्वर आणि महेश्वरला जात आहोत... जिथे आमचे आजोबांची पोलिसात असताना पोस्टिंग होती. दबंग 3 चित्रपटाच्या सेटवरून सलमान खानचा पहिला फोटो देखील समोर आला आहे. यात सलमान खान चुलबुल पांडेच्या सिग्नेचर पोझमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये एक निळा शर्ट घातलेला सलमान खानचा बॅक लुक दिसत आहे. त्याच्या शर्ट कॉलरवर एव्हिएटर देखील दिसत आहे. हा पोझ सलमान खानचा दबंग ट्रेडमार्क आहे. चित्रपटातील दिग्दर्शक प्रभुदेवा देखील फोटोमध्ये दिसत आहे.
 
दबंग 3 मध्ये पुन्हा एकदा, सलमान खानबरोबर सोनाक्षी सिन्हा दिसेल. हा चित्रपट दबंग फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. अभिनव कश्यप ने दबंग आणि अरबाज खानने दबंग 2 दिग्दर्शित केले होते. दोन्ही चित्रपट सुपर हिट होते. अहवालानुसार, दबंग 3 या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होईल.