1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 13 जुलै 2023 (20:58 IST)

बॉलिवूडच्या ‘या’ सुपरहिट सिनेमांचे येणार रिमेक…

anushree mehata
social media
Bollywoods this superhit movies will be remade बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत जे वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. काही सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. या सिनेमांना बॉलिवूडच्या कल्ट सिनेमांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. अशाच काही कल्ट सिनेमांचे रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 3 सदाबहार हिंदी सिनेमांच्या रिमेकची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हे तिन्ही सिनेमे 70च्या दशकातील आहेत. अनेक प्रेक्षकांच्या ऑल टाइम फेव्हरेट सिनेमांपैकी हे 3 सिनेमे आहेत. या सिनेमांचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही सिनेमांची नायिका ही अभिनेत्री जया बच्चन आहे. कोणते आहेत ते सिनेमे पाहूयात.
 
बॉलिवूडमधील रिमेक होणारे असलेले 3 सिनेमे आहेत ते म्हणजे ‘मिली’, ‘कोशिस’ आणि ‘बावर्ची’. हे तिन्ही सिनेमे हिंदी मधील मास्टर पीस समजले जातात. 1972मध्ये रिलीज झालेला कोशिश हा सिनेमा. ज्यात अभिनेत्री जया बच्चन आणि संजीव कुमार प्रमुख भूमिकेत हते. सिनेमाचं दिग्दर्शन गुलजार यांनी केलं होतं. या सिनेमासाठी संजीव कुमार आणि गुलजार यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
 
त्यानंतर मिली हा सिनेमा. हा सिनेमा जेव्हाही समोर येतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं. अभिनेत्री जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी सिनेमात एकत्र काम केलं होतं. ऋषिकेश मुखर्जी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर पुन्हा एकदा जया बच्चन आणि राजेश खन्ना यांचा एव्हरग्रीन बावर्ची हा सिनेमा देखील ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता.
 
अभिनेत्री राधिका आपटेच्या मिसेज अंडरकवर या सिनेमाची दिग्दर्शिका अनुश्री मेहता हिने सोशल मीडियावर या तीन सिनेमांच्या रिमेकची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. तिनं पोस्ट लिहित याची अधिकृत घोषणा केली आहे. तिनं म्हटलंय, “अबीर सेनगुप्ता आणि माझी कंपनी जादूगार फिल्म्स srs प्रोडक्शनने समीर राज सिप्पी यांच्याबरोबर एकत्र येत आम्ही या तीन सिनेमांचे रिमेक तयार करत आहेत”.
 
“आपल्या ऑल टाइम फेव्हरेट सिनेमांना एका नव्या रुपात आणि नव्या रिमेकसह तुमच्यापर्यंत आणण्यासाठी उत्साही आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण कोशिश, बावर्ची आणि मिली हे सिनेमे केवळ देशात नाहीत देशाबाहेरही प्रसिद्ध आहेत. हे सिनेमे पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. ही जबाबदारी उत्तमरितीने पार पाडण्यासाठी आम्ही सर्वाधिक चांगले प्रयत्न करू. असा रिमेक तयार करून की ज्याची दूर दूर पर्यंत दखल घेतली जाईल”, असं तिनं म्हटलं.