मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (12:49 IST)

दीपिकाची भविष्यवाणी

अभिनेत्री दीपिका पदुकोण-रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्रात एकत्र स्पॉट झाले होते. दीपिकाने रणवीरचा आगामी सिनेमा 'सिम्बा' रिलीज होण्याआधीच तो ब्लॉकबस्टर ठरेल असे म्हटले आहे. एक अ‍ॅवॉर्ड सोहळ्यादरम्यान दीपिका म्हणाली, मला असे वाटते की हा सिनेमा यशस्वी होईल. सध्या आम्ही फक्त सिनेमाच्या रिलीजवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर हनीमूनचा आणि वाढदिवसाबाबत विचार करु. दीपिका म्हणाली, मला रोहित शेट्टीसोबत चेन्नई एक्स्प्रेसमध्ये एकत्र काम करताना मजा आली होती. त्याचबरोबर मी हे सांगू इच्छिते की, हा सिम्बासुद्धा 'ब्लॉकास्टर' ठरेल. 'सिम्बा'मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अली खान दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे.  'सिम्बा'हा चित्रपट साऊथच्या 'टेम्पर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते.