गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 डिसेंबर 2018 (12:37 IST)

अमृताचा 'कानाला खडा'

amruta khanvilkar
आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा नंतरच्या चढाला बघून जो खचत नाही तोच खरा विजेता ठरतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरच्या यशाचे गमकदेखील यातच दडलेल आहे. आपल्या पडत्या काळात हवालदिल न होता, महत्वाकांक्षा आणि चिकाटीच्या जोरावर तिने कमावलेले आजतागायतचे यश वाखाणण्याजोगं आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीतील या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टींना 'कानाला खडा' या कार्यक्रमाद्वारे तिने नुकतीच वाट करून दिली आहे. त्याबद्दल बोलताना ती असे मत व्यक्त करते कि, 'कोणीसुद्धा तुमच्या मागे तुमच्या पडत्या काळात उभं राहत नाही, केवळ आरशासमोर उभा असलेला माणूसच तुमच्यासोबत असतो.'
 
अमृताचे हे वाक्य तरुणांसाठी आदर्शवत असेच आहे. स्वतः च्या प्रयत्नांने व्यक्ती पुन्हा नवी उंची गाठू शकतो, यावर तिचा विश्वास आहे. तर उद्या रात्री ९ वा. पहायला विसरू नका 'कानाला खडा' !